हस्ताक्षरातील ३ गोष्टी ज्या उलगडतात आपलं अंतरंग (भाग 1)

तुम्हाला माहीत आहे का? की अंतर्मनाचा प्रभाव हस्ताक्षरात दिसतो. 

पुढील 10 मिनिटांत समजून घेऊ थोडंस हस्ताक्षर शास्त्राबद्दल आणि  हस्ताक्षरातील ह्या 3 गोष्टीबद्दल .. ज्यावर दिसतो आपल्या अंतर्मनाचा  प्रभाव.

हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा आणि  शेअर करायला विसरू नका. 

चला तर मग समजून घेऊ थोडंस हस्ताक्षर शास्त्राबद्दल...  


आपलं लिखाण हे आपल्या अचेतन मन आणि जागरूक मनाच्या पैलूंचा परिणाम आहे.  

हस्ताक्षरात व्यक्तिच्या व्यक्तिमत्वाचे दोन्ही अद्वितीय वैशिष्ट्य पाहू शकतो ते म्हणजे स्थिर आणि अस्थिर.

ज्याला Fixed आणि Unfixed Traits असंही म्हणतात. पुढील भागात आपण यावर सविस्तर चर्चा करूया. 

या भागात आपण अक्षर, अक्षरातील घटक आणि अंतर्मनाच्या काही पैलूंबद्दल समजून घेऊया.

अक्षरांचे मुख्य घटक म्हणजे बिंदु, सरळ रेष/रेघ आणि वक्र रेष/रेघ. ह्या घटकांचा संमिश्र आलेख म्हणजेच हे घटक एकत्रित करून लिहिलं जातं ते अक्षर.  जगातील कोणत्याही लिपीमध्ये  बिंदु, सरळ  आणि वक्र रेष / रेघ ह्या घटकांचा संमिश्र आलेखच असतो. त्या अक्षरांना उच्चार आणि अर्थ प्राप्त होतो आणि भाषा बनते.  

उदाहरणार्थ :



पुढील भागात आपण हस्ताक्षर शास्त्र आणि आपले स्वभाव विशेष याबद्दल अधिक जाणून घेऊ या. 
तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेन्ट बॉक्स मध्ये तुमची मत नोंदवा. आणि हस्ताक्षरा विषयी अधिक माहीत जाणून घेण्यासाठी मला संपर्क करू शकता. 

या आधी तुम्ही कधी हा विचार केला आहे का? की आपलं हस्ताक्षर हे आपल्या अंतर्मनांचे प्रतिबिंब असेल असं. 

आपण जितकं स्पष्ट आरश्यात आपण स्वत:ला पाहू शकतो तितकच स्पष्ट आपल्या हस्ताक्षरात आपले व्यक्तिमत्व, विचार, मानसिकता, बौद्धिक पातळी, योग्यता असे अनेक पैलू आपण स्पष्टपणे पाहू शकतो. फक्त त्या करिता निष्णात हस्ताक्षर विश्लेषण तज्ञाकरवी हे विश्लेषण करून घ्यायला हवे. 

आपली वैचारिक, मानसिक, आणि भावनिक प्रगती  साधण्याकरीता  हे शास्त्र वरदान ठरत आहे. 

मी नेहा सागवेकर Graphologist/ Energy Enhancement Expert 

यशस्वी भव: - Success Energy Mantra या Platform ची संस्थापिका 

येत्या 3 वर्षात 5000 पेक्षा जास्त व्यक्तींना त्यांची ऊर्जा योग्य दिशेनी कार्यान्वित करून त्यांना त्यांच्या आयुष्यात आणि व्यवसायात यशस्वी बनवणे हा माझा ध्यास... 

पुढील काही भागांमध्ये तुमच्या सोबत मी खूप मौल्यवान माहिती शेअर करणार आहे जी आपल्या अंतर्मन आणि आपले हस्ताक्षरातील संबंधित असेल.  

अधिक महितीकरिता माझा फेसबूक ग्रुपमध्ये सामील व्हा.   यशस्वी भव: - Success Energy Mantra

आता समजून घेऊ  हस्ताक्षरातील ह्या 3 गोष्टीबद्दल.. 

खालील उदहरणातील समस्यांचे समाधान निष्णात  हस्ताक्षर विश्लेषक सुचवू शकतात.  अक्षरातील आणि विचारतील  छोट्या बदलांचा  सराव केल्याने व्यक्तीच्या स्वभावात सकारात्मक बदल सहज घडवून आणता येऊ शकतात. 

1. 



प्रश्न १  : अधिक आक्रमक कोण वाटत आहे?
उत्तर: तुम्ही comment  बॉक्स मध्ये द्या. 

आपला  आक्रमक, चिडचिडा, माझं तेच खरं असा स्वभाव  आणि  प्रेमळ, शांत, जुळवून/ समजून घेणारा स्वभाव   आपल्याला अक्षरातून  सहज  हेरता येऊ शकतो.   

तुमच्या जवळील शाळेत जाणारी मुलं / एखादी मोठी व्यक्ति अति आक्रमक असेल आणि त्यांना स्वत:मध्ये बदल घडावा असे वाटत असेल तर  नक्की संपर्क करा.

2. 



प्रश्न २ : मनातील भावना मनामध्येच कोण ठेवते? कोण व्यक्त होत नाही?
उत्तर: तुम्ही comment  बॉक्स मध्ये द्या.    
        
स्वत:हून पुढाकार घेऊन बोलणारा आणि आपल्या मनातील गोष्टी मनात ठेवणारा  स्वभाव आपल्याला  अक्षरातून  सहज  हेरता येऊ शकतो.   

मनातील गोष्टी  बोलून न दाखवल्याने मानसिक ताण  वाढून अश्या व्यक्तिला नैराश्य येण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

तुमच्या जवळील शाळेत जाणारी मुलं / एखादी मोठी व्यक्ति मनातील भावनांना व्यक्त करू शकत नसतील  आणि त्यांना स्वत:मध्ये बदल घडावा असे वाटत असेल तर  नक्की संपर्क करा.

3. 


प्रश्न ३ : उत्साही भावना कोण अनुभवत  आहे?
उत्तर: तुम्ही comment  बॉक्स मध्ये द्या. 

उत्साहाने सगळ्यात भाग घेणार, सकारात्मक विचार करणारा आणि नकार घंटा वाजवणारा, कोणत्याही गोष्टीमध्ये शंका घेणारा स्वभाव आपल्याला अक्षरातून  सहज  हेरता येऊ शकतो. 

तुमच्या जवळील शाळेत जाणारी मुलं / एखादी मोठी व्यक्ति नकारात्मक भावनांनी ग्रस्त असतील  आणि त्यांना स्वत:मध्ये बदल घडावा असे वाटत असेल तर  नक्की संपर्क करा. 

अधिक माहितीसाठी क्लिक करा   नेहा सागवेकर 

तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला, ते नक्की सांगा. आपल्या मित्र मंडळी सोबत ही माहीत शेअर करा. माझ्या Facebook Group ला जॉइन करायला विसरू नका. 

१० मिनिटे काढून शेवट पर्यन्त वाचल्याबद्दल धन्यवाद.  

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आजचा विषय - अतिविचार भाग 1 - जाणून घ्या कोणत्या 5 गोष्टी तुमचे मानसिक आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरू शकतात....

लहान मुलांच्या आयुष्यातील महत्वाची 9 वर्ष जी घडवतील एक समृद्ध व्यक्तिमत्व, हस्ताक्षराच्या साहाय्याने!

आजचा विषय - अतिविचार भाग 2 - जाणून घ्या कोणत्या 5 गोष्टी तुमचे मानसिक आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरू शकतात....