पोस्ट्स

आजचा विषय - अतिविचार भाग 2 - जाणून घ्या कोणत्या 5 गोष्टी तुमचे मानसिक आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरू शकतात....

इमेज
  अतिविचार भाग - 2 जास्त विचार केल्याने  तुमच्या मेंदूचे नुकसान होऊ शकते हे तुम्हाला माहीत आहे का? कारण  दीर्घकाळापर्यंत ,  तणावामुळे तुमचा मेंदूच्या लहरींमध्ये बदल होऊ शकतो ज्यामुळे तुमच्या स्मरणशक्तीवर परिणाम होतो. आपण अतिविचार भाग 1 मध्ये वाचलं असेलच की अतिविचारांमुळे कोणत्याही व्यक्तिचं  मानसिक आरोग्य कसं बिघडू न त्या व्यक्तींची   मानसिक उर्जेचा ऱ्हास होतो.    अतिविचारभाग 1 वाचण्याकरिता क्लिक करा. भाग 1 मध्ये आपण खालील गोष्टींवर सविस्तर माहिती दिली आहे. तुम्ही जास्त विचार करत आहात हे तुम्हाला कसे कळेल ? कोणते विषय अतिविचारांकडे नेतात   अतिविचाराचा तुमच्यावर कसा परिणाम होतो ? मी नेहा सागवेकर (Energy Enhancement Expert) (NLP Practitioner & Coach, Life Coach, Hypnosis  Practitioner,  Graphologist, Logo Analyst)   Success Energy Mantra  या प्लॅटफॉर्मची संस्थापिका  माझं ध्येय - पुढील 3 वर्षात 5000 पेक्षा जास्त व्यक्तिंना  त्यांची मानसिक ऊर्जा योग्य दिशेने कार्यान्वित करण्यास मदत करणे ज्यामुळे त्या व...

आजचा विषय - अतिविचार भाग 1 - जाणून घ्या कोणत्या 5 गोष्टी तुमचे मानसिक आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरू शकतात....

इमेज
  अतिविचार भाग - 1       तुम्ही एकलं असेल की गरज ही शोधाची जननी आहे. आजच्या युगात माहितीच जाळं इतकं विस्तारल आहे की एक क्लिक वर सगळं स्क्रीनवर हजर..                                  त्यामुळे योग्य विचारांवर मनन, चिंतन करण्याची गरज, सदसदविचार करण्याची शक्ति, योग्य सवयी हे सगळं आपण हळूहळू  हरवून बसत आहोत. आणि यातूनच अतिविचारचा राक्षस आपले हात पाय पसरवायला लागला आहे. आपण आज पाहू की अतिविचारांमुळे कोणत्याही व्यक्तिचं मानसिक आरोग्य कसं बिघडू शकते आणि त्या अनुषंघाने त्या व्यक्तींची  मानसिक उर्जेचा ऱ्हास होऊन मानसिक अनारोग्याच्या दलदलीत व्यक्ती अजून ओढला जातो.  मी नेहा सागवेकर (Energy Enhancement Expert) (NLP Practitioner & Coach, Life Coach, Hypnosis  Practitioner,  Graphologist, Logo Analyst)   Success Energy Mantra  या प्लॅटफॉर्मची संस्थापिका  माझं ध्येय - पुढील 3 वर्षात 5000 पेक्षा जास्त व्यक्तिंना  त्यांची मानसिक ऊर्जा योग...

जाणून घ्या कोणत्या 5 गोष्टी तुमचे मानसिक आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरू शकतात....

इमेज
  तुम्हाला माहीत आहे का?  मानसिक स्वास्थ्य / आरोग्य बिघडवणाऱ्या गोष्टींना आपण स्विकारलं तर आपल्या मेंदूतील लहरींमध्ये बदल होतो आणि याचा परिणाम आपल्या भावनिक, शारीरिक, सामाजिक स्वास्थ्य ह्या सगळ्याच ठिकाणी होताना दिसतो. तुम्ही हा लेख वाचत आहात म्हणजे तुम्ही तुमच्या मानसिक आरोग्याबद्दल जागरूक आहात.  हो ना? त्यासाठी सगळ्यात आधी मी तुमचं अभिनंदन करते.  पुढील 5 लेखांतून गरजेची तसेच अधिक माहिती तुम्हाला देण्याचा माझा मानस आहे.  मी नेहा सागवेकर लाईफ कोच ( Energy Enhancement Expert)  Success Energy Mantra या प्लॅटफॉर्मची संस्थापिका  माझं ध्येय - पुढील 3 वर्षात 5000 पेक्षा जास्त व्यक्तिंना  त्यांची मानसिक ऊर्जा योग्य दिशेने कार्यान्वित करण्यास मदत करणे ज्यामुळे त्या व्यक्ती त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात आणि व्यवसायात यशस्वी होतील हाच माझा ध्यास आहे. जागतिक आरोग्य संघटना म्हणते की 80% शारीरिक व्याधी किंवा आजार हे मानसिक आरोग्याशी निगडीत आहे. आपण अनेक अशी उदाहरणं पाहू शकतो की आजार हे आधी मानसिक स्तरावर असतात आणि त्यावर उपाय न केल्यामुळे त्यांचे परावर्तन शारी...

हस्ताक्षरातील ३ गोष्टी ज्या उलगडतात आपलं अंतरंग (भाग 1)

इमेज
तुम्हाला माहीत आहे का? की अंतर्मनाचा प्रभाव हस्ताक्षरात दिसतो.  पुढील 10 मिनिटांत समजून घेऊ थोडंस हस्ताक्षर शास्त्राबद्दल आणि  हस्ताक्षरातील ह्या 3 गोष्टीबद्दल .. ज्यावर दिसतो आपल्या अंतर्मनाचा  प्रभाव. हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा आणि  शेअर करायला विसरू नका.  चला तर मग समजून घेऊ थोडंस हस्ताक्षर शास्त्राबद्दल...   आपलं लिखाण हे  आपल्या  अचेतन मन आणि जागरूक मनाच्या पैलूंचा परिणाम आहे.     हस्ताक्षरात  व्यक्तिच्या व्यक्तिमत्वाचे दोन्ही  अद्वितीय वैशिष्ट्य पाहू शकतो ते  म्हणजे  स्थिर आणि अस्थिर. ज्याला Fixed आणि Unfixed Traits असंही म्हणतात. पुढील भागात आपण यावर सविस्तर चर्चा करूया.  या भागात आपण अक्षर, अक्षरातील घटक आणि अंतर्मनाच्या काही पैलूंबद्दल समजून घेऊया. अक्षरांचे मुख्य घटक म्हणजे बिंदु, सरळ रेष/रेघ आणि वक्र रेष/रेघ. ह्या घटकांचा संमिश्र आलेख म्हणजेच हे घटक एकत्रित करून लिहिलं जातं ते अक्षर.   जगातील कोणत्याही लिपीमध्ये   बिंदु, सरळ  आणि वक्र रेष / रेघ ह्या घटकांचा संमिश्र आलेख...

लहान मुलांच्या आयुष्यातील महत्वाची 9 वर्ष जी घडवतील एक समृद्ध व्यक्तिमत्व, हस्ताक्षराच्या साहाय्याने!

इमेज
तुम्हाला माहीत आहे का? मुलांना साधारणपणे तिसऱ्या वर्षापासून अक्षर ओळख होते आणि मुलांच्या अचेतन मनाचा प्रभाव 12 ते 13 वर्षापर्यंत असतो. त्यामुळे या 9 वर्षाच्या कालावधीत अचेतन मनात प्रोग्रामिगसाठी खूप महत्वाचा आहे. मागील ब्लॉगमध्ये तुम्ही वाचले असेलच की शाळेत शिक्षक सगळ्यांना एक सारखच लिहायला शिकवतात पण प्रत्येक मुलाचे लेखन हे एकमेकांपेक्षा वेगळे असते. कारण   बऱ्याच अंशी जेव्हा मुलांना लहानपणी लिहिण्याकरीता   पाटी/ पेपर आणि   पेन्सिल दिली गेली आणि कसे लिहायचे हे शिकवले गेले, तेंव्हा सराव करण्याकरिता त्यांच्यावर कोणतेही नियम नव्हते. जी सर्वात सोयीस्कर पद्धत वाटू लागली तसे त्या मुलांनी लिहायला सुरुवात केली.   आजच युग जरी डिजिटल युग होत आहे असे म्हंटले, तरी मुलांचे संगोपन आणि शैक्षणिक प्रगतीत लेखन महत्वाची भूमिका बजावते. सुंदर अक्षर मुलांचे हस्ताक्षर हे नेहेमीच पालक आणि शिक्षकांच्या चर्चेचे विषय होते आणि पुढेही राहतील. मुलांच्या शाळेतील त्यांची शैक्षणीक प्रगतीत त्यांचे चांगले, वळणदार आणि सुस्पष्ट लिखाण हे नेहमीच अग्रस्थानी असते. नीटनेटके, सुटसुटीत आणि सुवाच्य ले...