जाणून घ्या कोणत्या 5 गोष्टी तुमचे मानसिक आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरू शकतात....


 तुम्हाला माहीत आहे का? 
मानसिक स्वास्थ्य / आरोग्य बिघडवणाऱ्या गोष्टींना आपण स्विकारलं तर आपल्या मेंदूतील लहरींमध्ये बदल होतो आणि याचा परिणाम आपल्या भावनिक, शारीरिक, सामाजिक स्वास्थ्य ह्या सगळ्याच ठिकाणी होताना दिसतो.

तुम्ही हा लेख वाचत आहात म्हणजे तुम्ही तुमच्या मानसिक आरोग्याबद्दल जागरूक आहात. 
हो ना? त्यासाठी सगळ्यात आधी मी तुमचं अभिनंदन करते. 

पुढील 5 लेखांतून गरजेची तसेच अधिक माहिती तुम्हाला देण्याचा माझा मानस आहे. 

मी नेहा सागवेकर लाईफ कोच ( Energy Enhancement Expert) 
Success Energy Mantra या प्लॅटफॉर्मची संस्थापिका 
माझं ध्येय - पुढील 3 वर्षात 5000 पेक्षा जास्त व्यक्तिंना  त्यांची मानसिक ऊर्जा योग्य दिशेने कार्यान्वित करण्यास मदत करणे ज्यामुळे त्या व्यक्ती त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात आणि व्यवसायात यशस्वी होतील हाच माझा ध्यास आहे.

जागतिक आरोग्य संघटना म्हणते की 80% शारीरिक व्याधी किंवा आजार हे मानसिक आरोग्याशी निगडीत आहे. आपण अनेक अशी उदाहरणं पाहू शकतो की आजार हे आधी मानसिक स्तरावर असतात आणि त्यावर उपाय न केल्यामुळे त्यांचे परावर्तन शारीरिक व्याधीत होते. यांनाच मनोकायीक आजार असे म्हंटले जाते.

उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल वाढणे, मानेच्या मणक्यांचे तसेच पाठीच्या कण्याचे आजार, कॅन्सर असे अनेक आजार मनोकायीक अशू शकतात.  

चला तर मग जाणून घेऊ त्या 5 गोष्टी ज्या तुमचं मानसिक स्वास्थ बिघडवू शकतात.

आत्ता आपण ज्या गोष्टीं बद्दल बोलणार आहोत त्या सगळ्याच आपल्या परिचयाच्या आहेत. आणि त्या सगळ्या व्यक्तिंकडे कमी जास्त प्रमाणात असतात. पण त्या गोष्टी मर्यादेपलीकडे गेल्या की मानसिक आरोग्य बिघडवू शकतात. 

इथे मला निक्षून सांगायचे आहे की मानसिक आरोग्य बिघडणे म्हणजे वेड लागणे नाही.  

आपण आत्ता फक्त त्या कोणत्या गोष्टी आहेत हे समजून घेणार आहोत त्यांची कारणे, लक्षणे, उपाय हे सगळं पुढील लेखांमध्ये तुमच्या समोर येतीलच त्यावर कश्या प्रकारे मात करून मनारोग्य स्वस्थ ठेवण्यासाठीच्या उपाय योजना देखील आपण समजून घेणार आहोत. 

1. अतिविचार (overthinking)

आपले विचार आपले भविष्य घडवतात पण अतिविचार आपले आरोग्य बिघडवू शकतात. 

2. मानसिक थकवा किंवा मरगळ (Feeling Low) - 


इच्छा असूनही कोणत्याच गोष्टींमध्ये उत्साह न वाटणे. सतत पडून राहवेसे वाटणे. आणि या अश्या स्वत:च्या वागण्याची खंत वाटत राहणे. 

3. ताण-तनाव ( Stress) -


ताण-तनाव उद्भवण्याची अनेक कारणे असतात. पण ताण-तनाव घेऊन समस्या सुटत नाहीत. कधी कधी क्षुल्लक समस्या असताना अवास्तव तणाव घेणारे बरेच व्यक्ती आपण आसपास पाहतो. 

4. चिंता (Anxiety) - 




काळजीच चिंतेत रूपांतर झालं की मनात आणि शरीरात अनेक बदल  चिंता करणारी व्यक्ती अनुभवू शकतो. असं म्हणतात की चिंतेत आणि चितेत समानता असते. चिंता व्यक्तीला जिवंतपणी जाळते चिता निधन पावल्यावर.

5. भीती (Fear) -

भीती ही काही विशिष्ठ कारणांमुळे वाटू शकते पण कधी कधी वाटणारी भीती ही अकारण वाटू शकते. अकारण म्हणजे ज्या भीतीच कारण माहीत नाही अशी भीती. 


वरील 5 गोष्टी आपली सोबत नेहेमी नेहमीच या न त्या कारणाने करत असतात. पण यातील कोणत्याही गोष्टीनी अक्राळविक्राळ रूप घेतल्यास आपलं सुखी जीवन विस्कळीत होऊ शकतं.

मानसिक आरोग्य जपण्यासाठी मानसिक ऊर्जा योग्य दिशेने ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण मनाला प्रोग्राम करू शकतो. Train Your Brain या कार्यशाळेत याविषयी मी प्रशिक्षण देते. तुम्हाला Train Your Brain या कार्यशाळेची माहिती हवी असल्यात Interested वर क्लिक करा.

पुढील लेखांमध्ये वरील 5 गोष्टीं विषयी विस्तृतपणे समजून घेवू. 

तुम्हाला हा लेख कसा वाटला मला नक्की कळवा. 
मानसिकता, मानसिक ऊर्जा  आणि मानसिक आरोग्यविषयी अजून माहितीपर लेख तुम्हाला वाचायला आवडतील का? कोणता विषय खोलवर तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल ते मला नक्की कळवा. 




टिप्पण्या

  1. वारी ल लेखातील सर्व गोष्टी बरोबर् आहे पन् त्यातून बाहेर कसे पड़ नार. उपा य सु च वा

    उत्तर द्याहटवा
  2. Train Your Brain कार्यशाळा तुम्हाला उपयोगी ठरेल. मला संपर्क करण्यासाठी interested वर क्लिक करा.

    उत्तर द्याहटवा
  3. पुढील blog वाचा
    अतिविचार - भाग 1
    शेवटपर्यंत नक्की वाचा.
    https://nehasagvekar.blogspot.com/2022/02/5_13.html

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आजचा विषय - अतिविचार भाग 1 - जाणून घ्या कोणत्या 5 गोष्टी तुमचे मानसिक आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरू शकतात....

लहान मुलांच्या आयुष्यातील महत्वाची 9 वर्ष जी घडवतील एक समृद्ध व्यक्तिमत्व, हस्ताक्षराच्या साहाय्याने!

आजचा विषय - अतिविचार भाग 2 - जाणून घ्या कोणत्या 5 गोष्टी तुमचे मानसिक आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरू शकतात....