पोस्ट्स

मार्च, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लहान मुलांच्या आयुष्यातील महत्वाची 9 वर्ष जी घडवतील एक समृद्ध व्यक्तिमत्व, हस्ताक्षराच्या साहाय्याने!

इमेज
तुम्हाला माहीत आहे का? मुलांना साधारणपणे तिसऱ्या वर्षापासून अक्षर ओळख होते आणि मुलांच्या अचेतन मनाचा प्रभाव 12 ते 13 वर्षापर्यंत असतो. त्यामुळे या 9 वर्षाच्या कालावधीत अचेतन मनात प्रोग्रामिगसाठी खूप महत्वाचा आहे. मागील ब्लॉगमध्ये तुम्ही वाचले असेलच की शाळेत शिक्षक सगळ्यांना एक सारखच लिहायला शिकवतात पण प्रत्येक मुलाचे लेखन हे एकमेकांपेक्षा वेगळे असते. कारण   बऱ्याच अंशी जेव्हा मुलांना लहानपणी लिहिण्याकरीता   पाटी/ पेपर आणि   पेन्सिल दिली गेली आणि कसे लिहायचे हे शिकवले गेले, तेंव्हा सराव करण्याकरिता त्यांच्यावर कोणतेही नियम नव्हते. जी सर्वात सोयीस्कर पद्धत वाटू लागली तसे त्या मुलांनी लिहायला सुरुवात केली.   आजच युग जरी डिजिटल युग होत आहे असे म्हंटले, तरी मुलांचे संगोपन आणि शैक्षणिक प्रगतीत लेखन महत्वाची भूमिका बजावते. सुंदर अक्षर मुलांचे हस्ताक्षर हे नेहेमीच पालक आणि शिक्षकांच्या चर्चेचे विषय होते आणि पुढेही राहतील. मुलांच्या शाळेतील त्यांची शैक्षणीक प्रगतीत त्यांचे चांगले, वळणदार आणि सुस्पष्ट लिखाण हे नेहमीच अग्रस्थानी असते. नीटनेटके, सुटसुटीत आणि सुवाच्य ले...

5 जबरदस्त ग्रॅफोलॉजी टिप्स, ज्या तुम्हाला व्यवसाय प्रगतीत मदत करतील.

इमेज
तुम्हाला माहित आहे का तुमच्या अक्षरावरून तुमची विचारसरणी , व्यक्तित्व आणि मानसिकता सहज ओळखता येऊ शकते . हे   शास्त्र म्हणजे   ग्रॅफोलॉजी . ग्रॅफोलॉजी म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या हस्ताक्षर आणि स्वाक्षरीवरून , त्या व्यक्तीच्या मनाचे विश्लेषण करण्याचे शास्त्र . एखाद्या व्यक्तीच्या हस्ताक्षरातून त्याची विचारसरणी आणि मानसिक स्थिती दर्शवली जाते . लक्षात घेतले तर , प्रत्येक व्यक्ती रोजच कोणत्या ना कोणत्या अडथळ्यांना समस्यांना आणि अडचणींना तोंड देत असतो . त्या समस्यांतून बाहेर पडण्याचा योग्य मार्ग शोधत असतो आणि मार्ग न मिळाल्यास तो निराश होतो ,   चिंताने ग्रस्त होतो .  पण यावर मार्ग आहे . हस्ताक्षर आणि मानवी वर्तन याचा काय संबंध ?🙋 ग्रॅफोलॉजी हे सूक्ष्म विज्ञान आहे .   जे प्राचीन काळापासून वापरले जात आहे . एखाद्या व्यक्तीच्या मनाचे विश्लेषण करण्यासाठी वापरले जात असे .   मानवी विचारसरणी आणि वर्तन याची उकल त्याच्या   हस्ताक्षर आणि स्वाक्षरी मध्ये लपलेली आहे...