5 जबरदस्त ग्रॅफोलॉजी टिप्स, ज्या तुम्हाला व्यवसाय प्रगतीत मदत करतील.


तुम्हाला
माहित आहे का तुमच्या अक्षरावरून तुमची विचारसरणी, व्यक्तित्व आणि मानसिकता सहज ओळखता येऊ शकते.


हे शास्त्र म्हणजे ग्रॅफोलॉजी.

ग्रॅफोलॉजी म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या हस्ताक्षर आणि स्वाक्षरीवरून, त्या व्यक्तीच्या मनाचे विश्लेषण करण्याचे शास्त्र.

एखाद्या व्यक्तीच्या हस्ताक्षरातून त्याची विचारसरणी आणि मानसिक स्थिती दर्शवली जाते. लक्षात घेतले तर, प्रत्येक व्यक्ती रोजच कोणत्या ना कोणत्या अडथळ्यांना समस्यांना आणि अडचणींना तोंड देत असतो. त्या समस्यांतून बाहेर पडण्याचा योग्य मार्ग शोधत असतो आणि मार्ग मिळाल्यास तो निराश होतो,  चिंताने ग्रस्त होतोपण यावर मार्ग आहे.


हस्ताक्षर आणि मानवी वर्तन याचा काय संबंध?🙋

ग्रॅफोलॉजी हे सूक्ष्म विज्ञान आहे.  जे प्राचीन काळापासून वापरले जात आहे. एखाद्या व्यक्तीच्या मनाचे विश्लेषण करण्यासाठी वापरले जात असे.  मानवी विचारसरणी आणि वर्तन याची उकल त्याच्या  हस्ताक्षर आणि स्वाक्षरी मध्ये लपलेली आहे.

उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्याच शाळेतील विद्यार्थ्यांचे घेऊ..



एक शिक्षक वर्गातील सर्व मुलांना एकाच वेळी एक सारखेच अक्षर आणि शब्द लिहिण्यास शिकवत असतात. तरी काही मुलांचे अक्षर सुंदर आणि सुवाच्य असते आणि काही मुलांचे अतिशय खराब, वाचताच ना येण्यासारखं.

ग्रॅफोलॉजी या शास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांनी त्यांच्या निरिक्षणातून व्यक्तीच्या समस्या जाणून घेतल्या आहेत आणि हस्ताक्षरातील काही बदलांचा मानवी जीवनात परिणाम दिसून येतात हे निदर्शनात आले आहे. 

अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक क्लिक करा. 

https://www.blogger.com/blog/post/edit/3767328501171148841/1334841072140437847


मी नेहा सागवेकर  Graphologist and Business Logo consultant

Success Energy Mantra (Energy Enhancement Expert)

Mission – येत्या 3 वर्षात 5000 पेक्षा जास्त व्यक्तींना / उद्योजकांना त्यांची Energy योग्य दिशेने सुनियोजित करून त्यांना मार्ग दाखवणे आणि त्यांच्या आयुष्यात आणि व्यवसायात यशस्वी बनवणे हा माझ्या ध्यास.  

 

ग्रॅफोलॉजी  व्यवसायात यशस्वी होण्यास कशी मदत करू शकेल? हे जाणून घेऊया.

या शास्त्राच्या मदतीने एक व्यक्ती व्यक्तिगत आयुष्यात तसेच व्यावसायिक पातळीवर समस्यांचे निराकरण करू शकते. आणि आपल्याला समाधानी, यशस्वी आणि आनंदी आयुष्य जगण्यास मदत करते.

हे विज्ञान आपल्याला आपल्या आयुष्यातील अज्ञात संभाव्यता/ संधी  आणि आव्हाने/धोके  'ब्लाइंड स्पॉट' ओळखण्याकरिता मदत करते तसेच आपल्या समस्या प्रभावीपणे कशी सोडवली जाऊ शकते या  प्रयत्नकरिता मदत करेल. 

ग्रॅफोलॉजी तुम्हाला फक्त व्यक्तिगत जीवनातच नाही तर तुम्हाला व्यवसायिक प्रगती साधून देण्यास सक्षम आहे.

व्यवसायात यशस्वीपणे व्यवसाय करणारा उद्याजक असो वा व्यवसायात पाय रोवण्याकरिता संघर्ष करणारा व्यवसायिक असो, प्रत्येक उद्योजकांना काही समान समस्यांना तोंड द्यावे लागते. त्याचे परीणाम वेगवेगळे असू शकतात. आर्थिक समस्या,  व्यवसायाकरिता योग्य जागा शोधणे, कार्यक्षम कर्मचाऱ्यांना रोखून धरणे, नवीन ग्राहक शोधणे, आपल्यापेक्षा वरिष्ठ व्यक्ती समोर मत मांडण्याची असमर्थता, अपुरे नियोजन, अंमलबजणी करण्यात अडचनी येणे. कर्मचाऱ्यांचा कामाचा सरासरी दर्जा घसरणे, अस्या एक ना अनेक अडचणींना व्यवसायिक तोंड देत असतात. अश्या समस्यांचे समाधान ग्राफोलॉजीमध्ये शोधू शकतो. समस्यांवर मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाची समस्येवर सहज विजय मिळवला  जाऊ शकतो

 

  • व्यक्तिगत जीवनासाठी ग्रॅफोलॉजी

नकारात्मक आणि सकारात्मक विचार, बोलका आणि अबोल स्वभाव, एकाग्रता, ध्येय असणे नसणेनात्याविषयीचा दृष्टिकोन, आर्थिक स्थिती आणि त्या विषयी ची मानसिकता असे अनेक स्वभावाचे अनुषंगाने आयुष्यात पडसाद पडतात. आणि आपल्या स्वभावाचा आणि मानसिकतेचा सरळ सरळ संबंध हा आपल्या अंतर्मन मध्ये साठवलेल्या माहिती आणि अनुभवातून निर्माण झालेले समज- गैरसमज, पूर्वायुष्यातील प्रसंगाशी आहे.

असं म्हणू शकतो की आपल्या मेंदूत फीड झालेले प्रोग्रामिंग मुळे आपली आजची मानसिकता किंवा स्वभाव आहे.

तुम्ही ते प्रोग्रामिंग सहज बदलू शकता. हो..  हे शक्य आहे. अक्षरातील योग्य बदलांनी काही बरेच हवे असलेले बदल तुम्हाला जाणवू लागतील. आयुष्याला नवी दिशा देणे शक्य आहे.

 

  • व्यवसाय वाढीसाठी ग्रॅफोलॉजी

व्यवसाय वाढीसाठीची मानसिकता, निर्णयक्षमता, कॅल्क्युलेटिव रिस्क घेण्याचं धाडसआत्मविश्वास, सातत्य, एकाग्रता हे आणि असे अनेक गुण व्यावसायिकांकडे असणे आवश्यक आहे. हे गुण तुमच्यात आहेत का? हे विश्लेषण करून घेणे गरजेचे आहे.

 

ग्रॅफोलॉजी आपल्याला आपल्या आयुष्यातील आणि व्यावसायातील अज्ञात संभाव्यता/ संधी  आणि आव्हाने/धोके  'ब्लाइंड स्पॉट' ओळखण्याकरिता मदत करते हे आपण वर पाहीलच आहे.

 

  • प्रभावशाली लोगो, ब्रॅण्डिंग डिझाइन ज्यामुळे जास्तीचे ग्राहक आकर्षित करण्यासाठी


बिझनेस लोगो
डिझाइन करण्यात ग्रफोलॉजी महत्त्वपूर्ण आहे. कारण लोगो ही तुमच्या व्यवसायाची स्वाक्षरी आहे असं आपण म्हणू शकतो. स्वाक्षरीमध्ये ग्राहक आणि/ किंवा भागधारक आकर्षित करण्याची क्षमता असते. अयोग्य डिझाइनमुळे ग्राहक आणि/ किंवा भागधारक आपल्या पासून दूर करण्याची क्षमता ही आहे. अनेक उदाहरणे सापडतील तेजीत चालणारे उद्योग लोगो बदलल्यानंतर लयास गेले.

अनेक यशस्वी उयोजकांनी ग्रफोलॉजी चे ज्ञान असलेल्या एक्सपर्ट कडून  आपले लोगो लोगो डिझाईन करून घेतले आहेत. कारण त्या व्यावसायिकांना माहीत आहे की आपल्या विकासाकरिता ग्रफोलॉजीची क्षमतेने  व्यवसाय वाढ होण्यास मदत होते.

लोगोचे फाँट, कलर, आकार आणि अक्षरे मिळून लोगो बनतो, याकरिता लोगो बनवताना ग्रफोलॉजीचा आधार घेतला जातो. त्यामुळे व्यावसायिक कंपनीचा विशिष्ट सकारात्मक प्रभाव इतरांवर पाडू शकतात.

 

  • कर्मचाऱ्यांची नियुक्ती आणि त्याची काम करण्याची धारणा 

कर्मचाऱ्याचे
गुण ओळखून योग्य जबाबदारी दिल्यास कर्मचाऱ्याच्या कामातील उरक आणि विलक्षण सकारात्मक बदल झाल्याचे सिद्ध झालेले आहे. ते गुण ओळखण्यास ग्रफोलॉजी मदत करते.

एखादा व्यक्ती वास्तववादी, पुढचा विचार करणारा, वाढीभिमुख, सर्जनशील किंवा साधा, रस नसलेला आणि / किंवा कमी किंवा ध्येय नसलेला आहे की नाही हे विश्लेषण करण्यासाठी ग्रफोलॉजी एक्सपर्टची मदत सर्रास घेतली जात आहे. कारण ही वैशिष्ठ्ये एक्सपर्ट सहज ओळखू शकतो आणि कंपनीच्या व्यवसाय ध्येय गाठण्यासाठी योग्य टीमची  निवड खुप गरजेचं असते. नवीन कल्पना शोधणे, योजना आखणे आणि प्रोजेक्ट यशस्वी पुर्ण करणे याकरिता कर्मचाऱ्यांची योग्य निवड ही एक महत्त्व पुर्ण पायरी आहे.

 

  • अंतर्गत संघर्ष

टीम सदस्यांमधील छुपे भावनिक संघर्ष आणि परस्पर संबंधित आव्हाने ओळखण्यासाठी व्यवसायाचे मालक, व्यवस्थापक आणि कार्यकारणी टीमचे लेखन विश्लेषण वेळोवेळी केले जात आहेत. कारण अव्यक्त भावनांचा उद्रेक व्यवसायाला अडचणीत आणू शकतो अथवा जे व्यक्त होण्यास अक्षम आहेत त्याच्या कामगिरीवर विपरीत परिणाम दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच त्याच्या भावनिक आरोग्य धोक्यात येऊ शकते. अशे सूक्ष्म बदलही लिखाणात येतात आणि ते  विश्लेषण करताना दिसून येतात


    जे सुजाण व्यवसायिक आहेत, ते स्वत:च्या व्यवसायिक उन्नती करिता ग्रॅफोलोजिस्टच्या  मदतीने स्वतःचे मानसिक आणि आर्थिक आरोग्य नियमितपणे ओळखू आणि नियंत्रित करू शकतात.

    हस्ताक्षरामुळे काय प्रभाव पडू शकतो हे तुम्ही जाणून घेतलेत पण फक्त काही लिहिण्याच्या लकबी आणि वळणं तपासून त्यावर निष्कर्ष कडून त्यानुसार निर्णय घेणे चुकीचे ठरेल. त्याकरिता तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.


ग्रॅफोलॉजी हे शास्त्र तुम्हाला व्यक्तिगत आयुष्यात आणि व्यवसायिक प्रगतीमध्ये नक्कीच मदत करेल आणि खात्रीशीरपणे आधुनिक काळात व्यवसाय विकासासाठी आणि अडचणीतून मार्ग काढण्यासाठी हे शास्त्र संजीवनी ठरेल.

ज्यांना ग्रॅफोलॉजीबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे. त्यांनी यशस्वी भव: - Success Energy Mantra या fb ग्रुप जॉइन करा.

हा ब्लॉग आवडला असल्यास नक्की लाईक आणि शेअर करा.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आजचा विषय - अतिविचार भाग 1 - जाणून घ्या कोणत्या 5 गोष्टी तुमचे मानसिक आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरू शकतात....

लहान मुलांच्या आयुष्यातील महत्वाची 9 वर्ष जी घडवतील एक समृद्ध व्यक्तिमत्व, हस्ताक्षराच्या साहाय्याने!

आजचा विषय - अतिविचार भाग 2 - जाणून घ्या कोणत्या 5 गोष्टी तुमचे मानसिक आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरू शकतात....