लहान मुलांच्या आयुष्यातील महत्वाची 9 वर्ष जी घडवतील एक समृद्ध व्यक्तिमत्व, हस्ताक्षराच्या साहाय्याने!
तुम्हाला माहीत आहे का?

मागील ब्लॉगमध्ये तुम्ही वाचले असेलच की शाळेत शिक्षक
सगळ्यांना एक सारखच लिहायला शिकवतात पण प्रत्येक मुलाचे लेखन हे एकमेकांपेक्षा
वेगळे असते. कारण बऱ्याच अंशी जेव्हा
मुलांना लहानपणी लिहिण्याकरीता पाटी/ पेपर
आणि पेन्सिल दिली गेली आणि कसे लिहायचे हे
शिकवले गेले, तेंव्हा सराव करण्याकरिता त्यांच्यावर कोणतेही नियम नव्हते. जी
सर्वात सोयीस्कर पद्धत वाटू लागली तसे त्या मुलांनी लिहायला सुरुवात केली.
आजच युग जरी डिजिटल युग होत
आहे असे म्हंटले, तरी मुलांचे संगोपन आणि शैक्षणिक प्रगतीत लेखन महत्वाची भूमिका
बजावते.

सुंदर अक्षर
मुलांचे हस्ताक्षर हे नेहेमीच पालक आणि शिक्षकांच्या
चर्चेचे विषय होते आणि पुढेही राहतील. मुलांच्या शाळेतील त्यांची शैक्षणीक प्रगतीत
त्यांचे चांगले, वळणदार आणि सुस्पष्ट लिखाण हे नेहमीच अग्रस्थानी असते. नीटनेटके,
सुटसुटीत आणि सुवाच्य लेखनाचे नेहमीच अधिकचे गुण मिळतात.
शिक्षकांच्या आणि पालकांच्या दृष्टीने लहान मुलांच्या शाळेच्या कामगिरीतील सर्वात मोठा भाग म्हणजे ते कसे लिहितात, त्यांचे लिखाण चांगले आणि सुंदर आणि सुस्पष्ट प्रस्तुतीकरण असेल हवे असते.
हस्ताक्षर, मुलांचे स्वभाव विशेष आणि व्यक्तिमत्व यातील संबंध.
- लहान मुलांचे लिखाण, अचेतन मनाचे प्रोग्रामिंग आणि त्यांचा दृष्टिकोण यात काही संबंध आहे का ?

मुलांच्या 12 ते 13 वर्षापर्यंत त्यांच्या विचार करण्यात,
वागण्यात व बोलण्यात अचेतन मनाचा खूप प्रभाव असतो. अचेतन मनाच्या प्रोग्रामिगसाठीचा
हा सुवर्णकाळच. मुलांवर केलेले संस्कार, त्या वयातील त्यांचे
अनुभव, घटना आणि त्या बद्दलचे इतरांनी केलेले भाष्य, काही गोष्टी करण्याकरीता
दिलेले प्रोत्साहन किंवा काही गोष्टी न करण्यासाठी केलेली अडवणूक, केलेले कौतुक किंवा खच्चीकरण, लहान वयात चुकीसाठी
केलेली डोळेझाक किंवा केलेल्या शिक्षा, शिक्षेच्या पद्धती, सत्य व असत्य बोलणे
याबद्दल सांगितले गेलेल्या गोष्टी आणि वास्तविकता अश्या अनेक गोष्टींमुळे बालमनावर
होणारे परिणाम दूरगामी असतात. या गोष्टी त्या मुलाचे दृष्टिकोण ठरवतात जे खोल मनात
रुजवले जातात.
- लिखाण हे प्रत्येक मुलांच्या संगोपणात विशेष भूमिका बजावते का?

आपल्या मुलाच्या भावना समजून घेणे गरजेचे आहे कारण आपण सर्वजण वेगवान जीवन जगत आहोत त्या वेगवान जीवनात गोष्टी अधिक जटिल होऊ लागल्या आहेत. पालकांना आव्हान असणारी एक सामान्य वाटत असली तरी खूप महत्वाची बाब म्हणजे त्यांचे त्यांच्या स्वत:च्या मुलांशी असलेले संबंध. मुलांच्या खाण्याच्या सवयींमध्ये त्यांना हवे असलेले अपेक्षित बदल, हट्टी स्वभाव किंवा मनमानी वर्तणूक तसेच पालकांच्या मताला पूर्णपणे विरोध करण्याच्या वृत्तीमुळे, पालकांना एकच मुल हवे असल्यानी मुलांकडे सांघिक भावनेचा अभाव असतो. यामुळे अधिक जागरूक व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणार्या तरुण वयाच्या पालकांना, त्यांच्या मुलांना घडवताना अनेक अडथळा येऊ शकतात.
ग्राफोलॉजीच्या
मदतीने पालक आपल्या मुलांना चांगल्या दृष्टीकोनातून समजून घेतात आणि त्यांच्यावर
त्यांच्या पालकांचे सामर्थ्य, कमकुवतपणा,
आवडी, नापसंती, कौशल्ये, विचार करण्याचे मार्ग, आरोग्य आणि त्यांचे प्रभाव दिसून येतात. भविष्यात प्रेमळ जबाबदार व्यक्ती होण्यासाठी त्यांच्यात दडलेली कौशल्ये समजून
त्यांना वाढविण्यासाठी मदत करून
मुलांच्या आयुष्याला योग्य आकार देऊ शकतात.
- सगळ्यात महत्वाचे मुलांचे लिखाण आणि व्यक्तिमत्व घडत असताना त्यावर आसपासच्या व्यक्तींच्या लिखाणाचा व व्यक्तीमत्वाचा प्रभाव दिसून येतो का?
विशेष लक्ष केंद्रित करण्याची गोष्ट ही आहे की ज्या मुलांचे
अक्षर दिसायला अतिशय सुंदर असूनही आयुष्यात ते यशस्वी होऊ शकले नाही पण याउलट
ठीकठाक वाचनयोग्य अक्षर असलेल्या मुलांनी उत्तुंग यश संपादन केलेले निदर्शनात आले
आहे. मुलाचे हस्ताक्षर कदाचित
आपल्या डोळ्यास सजावटीच्या आणि आकर्षक वाटतील पण ग्राफॉलॉजीनुसार त्याचे काही
धोकादायक अर्थ लपलेले असू शकतात.
प्रत्येक मुलाचे
मन बालपणात मुलाच्या आयुष्यातील सहसा पालकांच्या आणि शिक्षकांच्या प्रभावाद्वारे प्रोग्राम केले जाते. लहानपणी ज्या व्यक्तीचे
अनुकरण करण्याचा प्रयत्न केला त्या माणसाप्रमाणे आपण वागू इच्छितो. मग ते पालक असो वा शिक्षक असो वा इतर
जवळील व्यक्ति.... एक प्रकारे आपल्या हस्ताक्षरांप्रमाणे आपले अद्वितीय
व्यक्तिमत्त्व आहे ते आपल्या जीवनात तसेच व्यक्तिमत्त्वावर
ज्या व्यक्तीचे अनुकरण करण्याचा आपण प्रयत्न केला त्यांचा प्रभाव असणे स्वाभाविक आहे असे आपण म्हणू शकतो.
- मुलांच्या व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब लिखाणात दडलेले आहे का?

खूप महत्वाची गोष्ट, ज्या लोकांचा प्रभाव मुलांवर असतो त्यांचे लिखानाच्या लकबी तसेच वळण मुले सहजगत्या अनुकरण करतात. आपण म्हणू शकतो की त्या विशेष व्यक्तींच्या व्यक्तिमत्वचे प्रतिबिंब मुलांच्या व्यक्तिमतवामध्ये प्रतिबिंबीत होऊ लागते. असे अनेक व्यक्तींचे अनुकरण केल्याने मुलांच्या व्यक्तिमत्वात देखील विविध प्रभाव पाडणार्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वांचे एकत्रीकरण होते. आणि दुसर्याची नक्कल करण्याच्या प्रवासामध्ये आपण आपल्या हस्तलेखनावर प्रभाव पाडल्यामुळे बहुधा आपण आपली मौलिकता/ विशेषता गमावू शकतो. याचा परिणाम असा होतो की कधीकधी व्यक्तीचे आयुष्य दिशाहीन होते. आयुष्याच्या उतरार्धात त्या मुलांच्या लक्षात येते की आपले आपसूक घडत गेलेले व्यक्तिमत्व आणि आयुष्यात मिळालेली निराशा याचा संबंध आहे. तेंव्हा ग्राफॉलॉजी विज्ञानाच्या मदतीने, नव्याने अचेतन मनाचे प्रोग्रामिंग करण्याकरिता योग्य पद्धतीने हस्ताक्षराची दुरुस्ती करून करता येऊ शकते,
- मुलांची कौशल्ये वा कार्यक्षमता हस्ताक्षरावरून अधोरेखित होऊ शकते का?

मुलाच्या
हस्ताक्षरचे विश्लेषण करून आपल्या मुलास योग्य दिशा दाखवणे ही जबाबदारी आता आपल्यावर आहे. यासाठी, आपल्या मुलास काय हवे आहे? त्याच्या क्षमता काय आहेत? कोणत्या क्षेत्रांमध्ये
ते उत्कृष्ट कामगिरी करू शकतात? हे आपल्याला समजून घेणे आवश्यक आहे. मुलामध्ये
वेगवेगळ्या प्रतिभा असतात. काही प्रतिभा ह्या सराव, अनुभव आणि वयानुसार विकसित केल्या जातात तर काही जन्मजात आणि नैसर्गिकरित्या अंगीभूत असतात.
एखाद्यातील नैसर्गिक आणि स्वाभाविक अशा प्रतिभा ओळखणे
आवश्यक आहे कारण बऱ्याचदा
ते गुण अथवा प्रतीभांशी बरेच जण अपरिचित असतात. ती अपरिचित प्रतिभा मुलास काम करण्यास प्रोत्साहित करत असते. मुलांना नैसर्गिकरित्या लाभलेल्या कौशल्यांना अजून धारदार केले तर निश्चितपणे सहजतेने यश मिळेल.
आणि ते कसे ओळखाल? हस्ताक्षर
विश्लेषणाच्या मदतीने.
- मुलांचा विचार करण्याचा दृष्टिकोण सकारात्मक आहे की नकारात्मक हे लिखणावरून कळू शकते का?

आपण वर वाचलेच आहे की मुलाचे हस्ताक्षर कदाचित आपल्या डोळ्यास सजावटीच्या आणि
आकर्षक वाटतील पण ग्राफॉलॉजीनुसार त्याचे काही धोकादायक अर्थ लपलेले असू शकतात.
म्हणूनच, आपल्या मुलास फक्त छान
लिहायला शिकवू नका तर त्या मुलांना व्यक्ती म्हणून घडताना आणि आयुष्याचे पालनपोषण करण्यासाठी योग्य दिशा जीवनाला मिळवून देण्यासाठी
त्याच्या / तिच्या
हस्तलेखनाचे विश्लेषण करण्याकरिता हस्ताक्षर विश्लेषकाची मदत घ्या.
· पालकांनी आणि शिक्षकांनी सतर्क असले पाहिजे.
मुलाच्या मनात
काय भावना कार्यरत आहेत हे समजून घेण्यासाठी पालकांनी आणि शिक्षकांनी सतर्क असले
पाहिजे. हे लक्षात ठेवणे देखील महत्त्वाचे आहे की प्रत्येक मुलागणिक प्रतिसादांतील भिन्नता असू
शकते. काही मुलांच्या प्रतिसादाला दुर्लक्ष केले जाऊ शकते असे काही पैलू आहेत परंतु काहींमध्ये प्रारंभिक
अवस्थेत पासूनच त्यांचे स्वभाव व
वर्तणूक चिंताजनक ठरू शकते. आपले
मूल सुंदर आणि अद्वितीय आहे आणि ग्राफॉलॉजीचे विज्ञान आपल्याला आपल्या
मुलांबद्दल चांगल्या प्रकारे समजून
घेण्यात आणि आपल्या मुलासह आपल्या अद्वितीय संबंधाची मजबुती आणण्यास मदत करू शकते.
· मुलाच्या हस्ताक्षरांची तपासणी करा.

मुलाच्या हस्ताक्षरांची तपासणी करणे आवश्यक आहे आणि योग्य पद्धतीने ते दुरुस्त करणे ही आवश्यक आहे. पालक आणि / किंवा शिक्षक म्हणून आपण त्यांना योग्य अक्षरे कशी लिहावी, हे शिकवतो पण मुले हळूहळू शिकतात आणि त्यांचे स्वतःचे बदल त्यात जोडले जाऊ शकतात. एखाद्या मुलाच्या हस्ताक्षरात स्वतःच्या मनातून किंवा इतर व्यक्तीच्या हस्ताक्षरांचे अनुकरण केल्याने बदल होत असताना व्यक्तिमत्त्वातही बदल होऊ लागतो. ज्यांचे अनुकरण केले जात आहे ते प्रभावक व आक्रमक असतील आणि त्या वैशिष्ट्याशी संबंधित कुठेतरी हस्तलेखन रचना मुलाने कॉपी केल्या असतील तर मुलाला त्या व्यक्तिसमान गुण सहज मिळू शकतात. म्हणून मुलाच्या हस्ताक्षरांवर नजर ठेवणे आवश्यक होते.
मुलांचे स्वभाव विशेष आणि
समस्यां समजून घेण्याकरिता ग्राफोलॉजीचा योग्य पद्धती वापरले जाऊ शकते. यात सोपे लेखन उपचार घेणे सुरू केले असता,
मुलांच्या भीतीवर मात करण्यासाठी आणि स्वतःमध्ये सकारात्मक बदल
घडवून आणण्याच्या दिशेने मुलांना एक मार्ग देतात. ग्राफोलॉजी मुलास त्यांची कौशल्ये
दर्शविण्यास सक्षम करते, लक्ष्यांकडे जाण्यासाठी
गती प्रदान करते आणि मुलाची क्षमता वाढवते.
ग्रॅफोलॉजी हे शास्त्र तुमच्या मुलांचे व्यक्तिगत आयुष्यात आणि शैक्षणिक प्रगतीमध्ये नक्कीच मदत करेल आणि खात्रीशीरपणे व्यक्तिगत विकासासाठी आणि अडचणीतून मार्ग काढण्यासाठी हे शास्त्र संजीवनी ठरेल.
ज्यांना ग्रॅफोलॉजीबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे. त्यांनी यशस्वी भव: - Success Energy Mantra या fb ग्रुप जॉइन करा.
हा ब्लॉग आवडला असल्यास नक्की लाईक आणि शेअर करा.

खुप सुंदर blog neha maam
उत्तर द्याहटवाअतिशय महत्त्वपूर्ण व खुप उपयुक्त माहिती सांगीतलि
Thank you Shraddha
हटवाThank you Shraddha
हटवाThank you very much
उत्तर द्याहटवा