मी यशस्वी किंवा अयशस्वी आहे कारण...

?

मी यशस्वी किंवा अयशस्वी आहे कारण...

... मी तशी इच्छा व्यक्त केली होती.


इच्छा?🤔 हो इच्छा...


Whatever your mind can conceive and believe, It can achieve.    

Nepolean Hill

तुमचं मन ज्या गोष्टी स्विकारून विश्वास ठेवतो त्या गोष्टी प्रत्यक्षात येतात.

तर लक्षात घ्यायला हवं की आपण कोणत्या ईच्छा कळत- नकळत मनात आणतो.


बरेच लोकं नशिबाला दोष, दूषणं देत असतात , पण त्या सर्व लोकांनी लक्ष्यात घ्यायला हवं की आपले विचारच आपलं नशीब घडवत आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही.


ब्लॉग शेवटपर्यंत वाचा.👇👇👇



समजून घेऊया की ईच्छा ते नशीब हा प्रवास कसा होतो.

एखादा व्यक्ती यशस्वी किंवा अयशस्वी का होतो?


  • ईच्छा निर्माण झाली की..

तसे विचार मनात वारंवार मनात यायला लागतात. उदा. गोड खाण्याची ईच्छा झाली की आवडतं पक्वान्न  किंवा मिठाई खाण्याचे विचार मनात येतात.

  • विचारांतून शब्द निर्माण होतात. 

आपल्या भावना व्यक्त करण्याचं माध्यम म्हणजे शब्द. वरील उदाहरणं इथे लागू केले तर त्या पक्वांनाचे नावं, चव, आकार इ. मनात फेर धरू लागतील.

  • शब्दातून निर्माण होते ती कृती. 

विचारांना मूर्तरूप म्हणजे कृती.

आपण स्वतःशी बोलयला लागू किंवा इतरांना सांगू किंवा मेसेज करू. आणि आपण ते गोड पक्वान्न किंवा मिठाई खाऊ.

  • कृतीतून सवयी जडतात.

21 दिवस अविरत आपण जे काही करू त्याची सवय जडते. 21 दिवस आपण जे ही करू ते  22 व्या दिवशी न चुकता आपण करणार म्हणजे करणारच. 


  • तुमच्या सवयी तुमचे व्याकिमत्व आणि चारित्र्य ठरवतात

ज्या गोष्टींची आपण सवय करून घेतो तीच आपली ओळख बनते. आपली हिच ओळख म्हणजे आपलं व्यक्तिमत्त्व आणि तेच आपलं चारित्र्य.

जर आपल्या आयुष्यात आपण दुःखी असू तर आपण त्याकरिता बाहेरील अनेक गोष्टींना कारणीभूत ठरवतो. पण आपल्या इच्छाच ज्या कळत- नकळत मनात आल्या त्या आपल्या आयुष्यातील परिणामांकरीता जबाबदार आहेत.


👉 ईच्छा ही आपल्या नशीबाची सुरुवात आहे. 

👉 इच्छा हेच बीज आहे. 


कारले पेरले तर टोमॅटो कसा उगवेल???


यशस्वी व्यक्ती नेहेमी सकारात्मक विचार करतात आणि योग्य विचारांमुळे यश संपादन करतात.


आपल्या मनात कळत-नकळत नक्की काय रुजलं आहे? 

आपण काय पेरतो आहे? हे कसं कळणार...

🤔🤔🤔


सांगते... 


पण त्या आधी मला सांगा की तुम्ही कागद पेन घेऊन लिहिता का?

तुम्ही म्हणाल याचा इथे काय संबंध?

तर नीट लक्ष देऊन वाचा...


  • प्रत्येक अक्षर हे तुमचे विचार दर्शवतात. 

उदा. t मधली आडवी रेषा तुमच्या ध्येय्याविषयी तुमचे विचार दर्शवते.

आहे ना उत्सुकता वाढवणारे?


तर पुढे जाऊन ....


  • अक्षरातून बनतो शब्द. अनेक अक्षरे एकत्र केल्यावर शब्द लिहिला जातो हो ना?

जो कृती साठी जबाबदार असतो.  तुमचे शब्द सांगतात तुमच्या मनात काय काय चालले आहे. तुमच्या लिहिलेल्या शब्दातून कळतात खुप गोष्टी.


  • एक पूर्ण ओळ ही तुमची कृती दर्शवते. 

तुम्ही जे लिहिलंय ते नाही तर तुम्ही ते कसं लिहिलंय त्या वरून कळते. तुम्ही किती ओळी एका पानावर लिहिल्या त्यावरून तुम्ही किती कार्यशील आहात हे कळते आणि ओळीतून अजून बरंच काही कळते बरं का.


  • एक परिच्छेद paragraph तुमच्या सवयी दर्शवतात.

तुम्ही गोधळलेले आहात की स्पष्ट विचारांचे. तुम्ही रिस्क घेणारे की नाही. किंवा किती रिस्क घेता. तुम्ही स्थिर मनाचे आहात की मुडी. असे अनेक गोष्टींचा उलगडा होतो.


  • संपुर्ण लिखाण तूमचे चारित्र्य कथन करते. 

तुमचे व्यक्तिमत, विचार, अंतर्मनात रुजलेले अनेक पॅटन, तुमचे कौशल्ये, धोके, सवयी असे अनेक कंगोरे समोर येतात.


Graphology - Science of handwriting analysis..

 लेखन विश्लेषण शास्त्र

आपण जे लिहितो त्या क्रियेला phyco - neuro - motor activity असे म्हणतात. 

आपल्या अंतर्मनात रुजलेल्या अनेक गोष्टी आपल्या मेंदूच्या प्रणालीवर प्रभाव टाकतात. आपण लिहितो त्यातून त्या आपण विश्लेशीत करू शकतो. 

जसे आपण नाराज किंवा दुःखी असताना कोऱ्या पानावर लिहिले तर रेषा खालच्या दिशेने उतरत्या असतील उलट आनंदी आणि उत्साहित असू तेंव्हा वरचा दिशेनी चढत्या असतील. आणि शांत आणि रिलॅक्स असाल तेंव्हा सरळ रेषेत असतील.

तुम्ही हे आजमावून पाहू शकता. मला खात्री आहे तुमचं उत्तरं तुम्हाला मिळेल.

ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करा. फॉरवर्ड करा.

तुम्हाला तुमचं Handwriting आणि Signature विश्लेषण करून घ्यायचे असेल तर नक्की संपर्क साधा.


नेहा सागवेकर

https://www.facebook.com/groups/123541359594063/?ref=share














टिप्पण्या

  1. खूप सुंदर ब्लॉग.
    वाचण्याची उत्सुकता निर्माण करणारा ब्लॉग 👍🏻

    उत्तर द्याहटवा
  2. मस्त छान लिहिले आहे मॅडम जी मनःपूर्वक धन्यवाद

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आजचा विषय - अतिविचार भाग 1 - जाणून घ्या कोणत्या 5 गोष्टी तुमचे मानसिक आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरू शकतात....

लहान मुलांच्या आयुष्यातील महत्वाची 9 वर्ष जी घडवतील एक समृद्ध व्यक्तिमत्व, हस्ताक्षराच्या साहाय्याने!

आजचा विषय - अतिविचार भाग 2 - जाणून घ्या कोणत्या 5 गोष्टी तुमचे मानसिक आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरू शकतात....